FD News : गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफ डी वरील व्याज दरात मोठी वाढ केली आहे. अनेक राष्ट्रीय बँकांनी एफडीचे व्याजदर सुधारित केले आहेत याशिवाय देशातील अनेक स्मॉल फायनान्स बँकांनी देखील आपले एफ डी व्याजदर रिवाईज केले आहेत.
खरे तर जेव्हा-जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा आपल्या मनात बँकेच्या फिक्स डिपॉझिटचा विचार येतो. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला खात्रीशीर परतावा देखील मिळतो. यामुळे अनेक जण एफडी मध्ये गुंतवणूक करत आहेत.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर या चालू मे महिन्यात देशातील काही स्मॉल फायनान्स बँकांनी आपले एफ डी व्याजदर रिवाईज केले आहेत.
यानुसार गुंतवणूकदारांना आता एफ डी वर अधिकचे व्याज मिळत आहे. दरम्यान आता आपण मे महिन्यात कोणकोणत्या बँकांनी आपले एफडी चे व्याजदर रिवाईज केले आहेत आणि नवीन सुधारित दरानुसार ग्राहकांना एफडीवर किती व्याज मिळणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मे महिन्यात कोणत्या बँकांनी वाढवले एफडी वरील व्याजदर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक :
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने या चालू महिन्यात आपले एफडी वरील व्याजदर रिवाईज केले आहेत. बँकेच्या माध्यमातून आता दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एफडीवर चार टक्क्यांपासून ते 8.50% पर्यंतचे व्याज दिले जात आहे.
विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या बँकेच्या माध्यमातून 4.60% ते 9.10% पर्यंतचे व्याज दिले जातात. बँकेच्या माध्यमातून दोन वर्ष ते तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जात आहे.
RBL बँक :
आरबीएल बँकेने देखील आपले एफ डी चे व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वरील व्याजदर मे महिन्यात रिवाईज केले आहेत. RBL बँकेकडून दिले जाणारे सर्वाधिक व्याज 8 टक्के आहे, जे 18-24 महिन्यांच्या FD साठी दिले जात आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडी साठी 8.50% एवढे इंटरेस्ट दिले जात आहे.
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक :
या चालू मे महिन्यात कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेनेही एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर रिवाईज केले गेले आहेत. बँकेकडून आता FD वर 3.5 टक्के ते 7.55 टक्के व्याज दिले जात आहे. 400 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज दिले जात आहे.
सिटी युनियन बँके :
या बँकेने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. या चालू महिन्यातच ही सुधारणा झाली आहे. ही बँक आता आपल्या ग्राहकांना ५ टक्के ते ७.२५ टक्के व्याज देत आहे. बँकेकडून ४०० दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक ७.२५ टक्के व्याज दिले जात आहे.