Kanda Market News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत नाही. ती म्हणजे कांदा दरात वाढ झाली आहे. कांद्याच्या दरात फेब्रुवारी 2023 पासून दिवसेंदिवस घसरण होत होती. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात देखील गदारोळ पाहायला मिळाला.
कांद्याच्या मुद्द्यावरून विपक्षने शिंदे सरकारला जेरीस आणले. विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे कांद्याला अनुदान देण्याची मागणी देखील झाली. मुद्दा एवढा तापला की शिंदे सरकार गोत्यात आले आणि शासनाला अखेर कार कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान देण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागला.
शेतकऱ्यांना आता 200 क्विंटलच्या मर्यादेत अनुदान मंजूर होणार आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग झालेली नाही मात्र येत्या काही दिवसात ही रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती दिली जात आहे. अनुदान जमा होण्यापूर्वी मात्र कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा आता तीन हजाराच्या घरात पोहोचला आहे. आज राज्यातील काही बाजारात कांद्याचे दर 2500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक होते. राज्यातील चंद्रपूर गंजवड या एपीएमसी मध्ये आज कांद्याला तब्बल 2600 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.
या बाजारात मिळाला सर्वोच्च दर
चंद्रपूर गंजवड : आज राज्यातील या एपीएमसीमध्ये कांद्याची 624 क्विंटल आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 1400 रुपये प्रतिक्विंटल, कमाल 2600 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केट मध्ये आज 15,984 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला शंभर रुपये किमान, 2400 रुपये कमाल आणि एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला.
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या बाजारात आज 378 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. या बाजारात आज कांदा एक हजार रुपये प्रति क्विंटल किमान, 2600 रुपये प्रति क्विंटल कमाल आणि १८०० रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री झाला.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार : या बाजार समितीमध्ये 37 हजार 400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज या बाजारात कांद्याला 2500 रुपये कमाल दर, किमान दर तीनशे रुपये आणि सरासरी दर 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला.