Kitchen Tips:- बऱ्याचदा घरातील किचन मध्ये विविध प्रकारचा स्वयंपाक केला जातो व यामध्ये व्हेज स्वयंपाकासोबतच बऱ्याचदा मासे, चिकन आणि मटणासारखे नॉनव्हेज पदार्थ देखील बनवले जातात. परंतु जेव्हा असे पदार्थ किचनमध्ये बनतात तेव्हा त्यांचा काही विशिष्ट वास हा काही काळापुरता किचनमध्ये किंवा संपूर्ण घरामध्ये आपल्याला जाणवतो.
परंतु यामध्ये जर आपण नॉनव्हेज पैकी माशांचा विचार केला तर मासे जर किचनमध्ये शिजवले तर यांचा वास संपूर्ण किचनमध्ये अगदी तीव्र स्वरूपाचा येतो व तो नकोसा वाटतो. अशाप्रकारे येत असलेला हा माशांचा वास घालवण्यासाठी बऱ्याचदा परफ्यूमचा देखील वापर बरेच जण करतात किंवा इतर अनेक उपाय योजना किंवा किचन साफ करणे यासारख्या पर्याय अवलंबले जातात.
परंतु यामुळे देखील वास पूर्णपणे जात नाही व बऱ्याच वेळ पर्यंत तो किचनच नाहीतर संपूर्ण घरामध्ये घोंगावत राहतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये बऱ्याचदा येत असेल की हा वास पूर्णपणे आणि ताबडतोब कशा पद्धतीने जाईल? याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काही महत्त्वपूर्ण टिप्स बघणार आहोत ज्या वापरून तुम्ही स्वयंपाक घरातील माशांचा वास ताबडतोब घालवू शकतात.
या टिप्स वापरा आणि किचनमधील माशांचा वास घालवा
1- कापूर जाळून– कापूरचा वापर आपण घरातील हवा शुद्ध आणि प्रसन्न करण्यासाठी बऱ्याचदा करत असतो. यामध्ये असलेल्या सुगंधामुळे घरात जर कापूर जळाला तर घरातील दुर्गंध किंवा नकोस आपल्याला वास ताबडतोब नाहीसा होतो. याच कापराच्या गुणधर्मामुळे जर तुम्ही माशांचा वास येत असेल तर कापूरच्या एक ते दोन वड्या जाळल्या तर घरात सुगंध पसरतो व घाणेरडा व नकोसा असलेला वास गायब होतो.
2- लिंबू किंवा विनेगरचा वापर– लिंबू किंवा व्हिनेगर यांचा वापर आपण घर स्वच्छ करण्यासाठी आणि घरामध्ये सुगंध पसरवण्यासाठी देखील करू शकतो. यामध्ये लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर करून तुम्ही स्वयंपाक घरातील माशांचा वास घालवू शकतो.
याकरता तुम्हाला एका लहानशा पातेल्यामध्ये थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घ्यावा लागेल व त्यात पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित उकळून घ्यावे. जेव्हा लिंबाचा रस उकळत असतो वा विनेगर आणि पाणी उकळते तेव्हा त्यामधून येणाऱ्या हलक्या सुगंधामुळे घरातील माशांचा वास नाहीसा होतो.
3- दालचिनी आणि लवंगचा वापर– प्रत्येक घरामध्ये लवंग आणि दालचिनी उपलब्ध असते. हे मसाल्याचे पदार्थ असून यांचा वापर करून तुम्ही घरातील नकोसा असलेला वास घालवू शकतात.
यासाठी तुम्हाला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यावे लागेल व त्यात थोडी दालचिनी आणि लवंग घालून ते पाणी उकळून घ्यावे लागेल. यामध्ये जेव्हा हे दोघेही पदार्थ उकळले जातील तेव्हा पातेल्यावर झाकण ठेवू नये. लवंग आणि दालचिनी पाण्यात उकडून घेतल्यामुळे घरातील हवेमध्ये असलेली दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते.
4- दरवाजा आणि खिडक्यांचा वापर करावा– किचनमध्ये किंवा घरामध्ये जर माशांचा वास येत असेल तर स्वयंपाक घरातील खिडक्या, तसेच बाल्कनीचे दरवाजे उघडून ठेवणे गरजेचे आहे व घरामध्ये जी काही हवा,सूर्यप्रकाश येतो त्यामुळे हा वास निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे माशांचा जास्त प्रमाणात वास घरामध्ये येत असेल तर शक्य तितक्या लवकर दरवाजा व खिडक्या उघडून घरातील हवा खेळती ठेवणे गरजेचे राहते.
अशा पद्धतीने अगदी सोप्या टिप्स वापरून तुम्ही घरातील किंवा किचन मधील माशांचा नकोस असलेला वास घालवू शकतात.