Lek Ladaki Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यात महिलांसाठी आणि मुलींसाठी देखील शेकडो योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अलीकडे सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेचा देखील समावेश होतो.
या योजनेअंतर्गत राज्यातील एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, आज आपण लेक लाडकी योजनेची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबातील मुलींना मिळणार, या योजनेचे स्वरूप कसे असेल, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा या योजनेसाठी आवश्यक असलेला अर्ज कुठून डाऊनलोड करता येणारे यांसारख्या सर्वच बाबींची आज आपण माहिती पाहणार आहोत.
लेक लाडकी योजनेचे स्वरूप कसे आहे ?
महाराष्ट्र राज्य शासनाने घोषित केलेल्या या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, पहिलीला गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत.
कोणाला मिळणार लाभ
या योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच मिळणार आहे. म्हणजेच राज्यातील सर्वच कुटुंबातील मुलींना याच लाभ मिळू शकणार नाही. या योजनेअंतर्गत एक एप्रिल 2023 नंतर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीलाच लाभ मिळू शकणार आहे.
या योजनेअंतर्गत कुटुंबातील एक अथवा दोन मुलींना लाभ मिळणार आहे. कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असेल तर यापैकी मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्ज कुठे करायचा
ज्या मुली या योजनेसाठी पात्र असतील त्यांना या योजनेचा फॉर्म आता भरता येणार आहे. या योजनेचा फॉर्म हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
यासाठी विहित नमुन्यातील अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे. यासोबत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे देखील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करावी लागणार आहेत.
फॉर्म कुठून डाऊनलोड करणार
https://drive.google.com/file/d/1JSi9q34FQeSVwDUNGQT6WpQy8lSgaZTq/view?fbclid=PAAabbdEB9xqX0ne0KsMMcaBbzCZ6BD3BHZNjPjSR0jk4QyiWbBr0Aap78I-o या लिंक वर जाऊन या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करता येणार आहे.
फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर सदर विहित नमुन्यातील अर्ज काळजीपूर्वक भरून हा अर्ज अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचा आहे.