LIC Policy : अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स गुंतवणूकदारांपुढे आहेत. मात्र आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. अनेक जण आजही एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्याला विशेष महत्त्व दाखवतात. एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना गुंतवणूकदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
दरम्यान आज आपण एलआयसीची अशीच एक भन्नाट योजना जाणून घेणार आहोत. एलआयसीच्या माध्यमातून लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांसाठीच पॉलिसी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान आज आपण एलआयसीच्या अशा एका पॉलिसीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एका ठराविक रकमेची गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला दरमहा 20 हजार रुपये मिळणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कोणती आहे ही पॉलिसी योजना.
कोणती आहे ही एलआयसीची पॉलिसी
एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी ही तुम्हाला दरमहा निश्चित परतावा देणार आहे. ही पॉलिसी उतार वयात तुमच्या कामाची ठरू शकते. या पॉलिसीची विशेषता म्हणजे तुम्हाला येथे एक रकमी पैसा गुंतवावा लागतो आणि मग तुम्हाला या रकमेवर दरमहिना व्याज मिळते.
म्हणजेच येथे तुम्हाला एकदाच रक्कम गुंतवावी लागते. येथे प्रत्येक महिन्याला प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही. एकदा रक्कम भरली की मग तुम्हाला यातून प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणार आहे.
ही पॉलिसी एलआयसीच्या एजंट कडून किंवा मग ऑनलाईन खरेदी केली जाऊ शकते. दरम्यान आता आपण या पॉलिसी मधून 20000 रुपये मिळवण्यासाठी किती रुपयांची गुंतवणूक करावी लागणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
किती गुंतवणूक करावी लागणार?
जर तुम्हाला जीवन अक्षय पॉलिसी मधून महिन्याला वीस हजार रुपये कमवायचे असतील तर चाळीस लाख 72 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
जेव्हा तुम्ही ही पॉलिसी बंद करणार तेव्हा तुमची रक्कम परत केली जाईल मात्र यावर तुम्हाला दुसरा कोणताच लाभ मिळणार नाही. पॉलिसी मधील रक्कम काढल्यानंतर तुम्हाला दर महिना मिळणारी वीस हजार रुपयाची पेन्शन बंद होणार आहे.
जोपर्यंत तुमचा पैसा या पॉलिसीमध्ये राहील तोपर्यंत तुम्हाला यावर पेन्शन किंवा व्याजरूपी परतावा मिळत राहणार आहे. एलआयसीची ही एकल आणि संयुक्त विमा पॉलिसी आहे. यामध्ये दहा वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.