LPG Gas Cylinder Price : घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरेतर गेल्या काही काळापासून घरगुती गॅस ग्राहकांना वाढत्या दराचा मोठा फटका बसत आहे. सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत.
मात्र या किमती लॉंग टर्म कायम राहणार का हा मोठा प्रश्न आहे. कारण की, मध्यँतरी गॅस सिलेंडरच्या किमतींनी नवीन विक्रम गाठला होता. दरम्यान आता सरकारच्या माध्यमातून जे लोक ब्लॅकने सिलेंडर खरेदी करत आहेत म्हणजेच चुकीच्या पद्धतीने सिलेंडर खरेदी करत आहेत त्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे.
दर महिन्याला ब्लॅकमध्ये सिलेंडर खरेदी करणाऱ्यांची आता खैर नाही. सरकारने अशा लोकांविरोधात आता कठोर कारवाई सुरू केली आहे. अशा ग्राहकांचे थेट गॅस कनेक्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे, भविष्यात अनेक ग्राहकांचे गॅस कनेक्शन कापले जाणार आहे.
कारण की चुकीच्या पद्धतीने गॅस सिलेंडर खरेदी करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे असा दावा जाणकार लोकांकडून केला जातोय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या संदर्भात नुकतीच मोठी माहिती दिली आहे.
मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट ग्राहकांना यादीतून हटवण्यासाठी ईकेवायसीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आधार कार्डच्या माध्यमातून राबवली जात आहे.
जर समजा या ईकेवायसी प्रक्रिया अंतर्गत प्राप्त होणाऱ्या माहितीमध्ये आणि ग्राहकाने कनेक्शनसाठी दिलेल्या माहितीमध्ये साधर्म्य आढळले नाही तर अशा बोगस ग्राहकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. अशा ग्राहकांचे थेट गॅस कनेक्शनचं रद्द होणार आहे.
अशा बोगस ग्राहकांना भविष्यात एकही सिलेंडर मिळणार नाही. विशेष म्हणजे ज्या ग्राहकांच्या नावावर असणाऱ्या एलपीजी सिलेंडरचा वापर हा व्यावसायिक कामांसाठी होत आहे अशा लोकांना देखील ग्राहक यादीतून वगळले जाणार आहे.
महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया तब्बल आठ महिन्यांपासून सुरू आहे. सध्या भारतात 32.64 कोटी घरगुती गॅस ग्राहक आहेत, त्यामुळे भविष्यात यातून किती लोकांचा पत्ता कट होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.