LPG Gas Price : घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान एक जून 2024 ला पूर्ण होणार आहे. यानंतर चार जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकालानंतरच सत्ताधारी पक्ष पुन्हा एकदा सत्ता काबीज करते की विपक्ष काही मोठा उलट फेर करणार हे समजू शकणार आहे.
मात्र या निवडणुकीच्या धामधूमीत घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीनंतर गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा वाढू शकतात.
याचे कारण म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये निवडणुकांच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत आणि निवडणुका झाल्यात की लगेचच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत.
निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होतात आणि निवडणुका झाल्यात की पुन्हा एकदा किमती पूर्वपदावर येऊन जातात.
यंदाच्या निवडणुकीत देखील हाच ट्रेंड फॉलो केला जाईल आणि निवडणुका पूर्ण झाल्यात की गॅस सिलेंडरच्या किमती वाढतील अशा चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहेत.
त्यामुळे आता चार जून नंतर गॅस सिलेंडरच्या किमती वाढतात की कायम राहतात हे पाहण्यासारखे राहणार आहे. खरे तर प्रत्येक महिन्याला गॅस सिलेंडरच्या किमती बदलत असतात. महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो.
मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. पण 19 किलो वजनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमती नाममात्र वाढवल्या गेल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मार्च 2023 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत राजधानी दिल्लीत 1103 रुपयांवर पोहोचली होती.
याआधी ही किंमत 1053 रुपये एवढी होती. मात्र ऑगस्ट 2023 मध्ये सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या किमती तब्बल दोनशे रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. 30 ऑगस्ट 2023 ला गॅस सिलेंडरची किंमत दोनशे रुपयांनी कमी झाली आणि किंमत 903 रुपयांवर आली.
यानंतर महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून देशभरातील महिलांना मोठी भेट दिली. 8 मार्च 2024 ला गॅस सिलेंडरच्या किमतीत आणखी शंभर रुपयांची घसरण झाली. तेव्हापासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये एवढी आहे.
म्हणजेच जवळपास तीन महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किमती कायम आहेत. पण आता लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खरंच निवडणुकीचा निकाल आल्यानंतर गॅस सिलेंडरच्या किमती वाढतील का हे पाहण्यासारखे राहणार आहे.