LPG Price 2024 : आज पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. 2024 चा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. ती म्हणजे तेल कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
खरेतर हे चालू वर्ष निवडणूकांचे वर्ष राहणार आहे. या चालू वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे, शिवाय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील राहणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल-मे 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे.
यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत.
याच निर्णयाचा एक भाग म्हणून नुकत्याच काही महिन्यांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.याशिवाय उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरच्या सबसिडीत 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आधी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर साठी दोनशे रुपयांची सबसिडी मिळत होती मात्र ही सबसिडी 300 रुपयांची झाली आहे.
एकंदरीत आता देशात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत.
आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती म्हणजे 19 किलो गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे.
कंपन्यांनी या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात दीड रुपयांची कपात केली आहे. या अंशता दर कपातीमुळे थोडासा सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
दरम्यान, तेल कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी आज एक जानेवारी 2024 पासूनच होणार आहे. तथापि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जैसे थेच राहणार आहेत.
यामुळे या निर्णयाचा सर्वसामान्यांना थेट फायदा मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र अप्रत्यक्षरीत्या या निर्णयाचा देखील सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.