Maharashtra Airport News : राज्यातील विमान प्रवाशांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईहून विमानाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे.
कारण की, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकाच दिवशी तब्बल 250 विमानांचे उड्डाण रद्द केले जाणार आहे.
यामुळे निश्चितच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळ एक दिवसासाठी बंद केले जाणार आहे.
खरंतर मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक अतिशय व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते. हे देशातील एक महत्त्वाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून परदेशात प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. या विमानतळावरून रोजाना हजारो प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करतात.
अशा परिस्थितीत ही बातमी आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची ठरणार आहे. खरंतर विमानतळ प्रशासनाकडून मान्सून सुरू होण्यापूर्वी आणि मान्सून संपल्यानंतर विमानतळावरील रनवेची म्हणजेच धावपट्टीची डागडुजीची किंवा देखभालीची कामे केली जातात.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी धावपट्टीची डागडुजी केली गेली होती. आता पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे आणि पावसाळा संपल्यानंतर विमानतळावरील धावपट्टीची डागडुजी करणे आवश्यक आहे. दरम्यान याच कामासाठी 17 ऑक्टोबर 2023 रोजी विमानतळावरील धावपट्टी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे.
यामुळे त्यादिवशी मुंबई विमानतळावरून धावणाऱ्या 250 विमानांचे उड्डाण रद्द केले जाणार आहे. तसेच काही विमानांच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. दरम्यान याबाबतची माहिती प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेणेकरून प्रवाशांना त्या दिवशी आपले प्रवासाचे नियोजन करताना सोयीचे होईल.
वास्तविक विमानांचं लँडिंग आणि टेकऑफ सुरळीत व्हावं, यासाठी पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्यानंतर धावपट्ट्यांची म्हणजे रनवेची डागडुजी केली जाते.
विमानतळाचे संचलन करणाऱ्या ‘मिआन’ कंपनीने ही माहिती दिली आहे. या कंपनीने एअरलाइन्स कंपनींना याबाबत सहा महिनेअगोदरच सुचित केले होते.