Maharashtra Anandacha Shidha News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात. यामध्ये महायुतीची सरशी झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत आणि याकडेच संपूर्ण राज्याचे आता लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांनी, साधारणता ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे.

खरे तर, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसू नये यासाठी राज्यातील महायुती सरकार सावध झाले आहे.

Advertisement

यानुसार, आता राज्य सरकारकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सरकारने राज्यातील महिला मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुद्धा जाहीर केली आहे.

अशातच आता सरकारने राज्यातील गोरगरीब जनतेला गणेशोत्सवाचा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला शंभर रुपये आनंदाचा शिधा मिळणार असून यासाठी आवश्यक असणाऱ्या 560 कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.

Advertisement

याचा लाभ राज्यातील तब्बल एक कोटी 70 लाख रेशन कार्ड धारक कुटुंबाला होणार आहे. यामुळे कोट्यावधी गरीब जनतेचा गणेशोत्सवाचा सण हा आनंदमयी होईल अशी आशा आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सरकारने हा निर्णय घेतला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

याअंतर्गत रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयांमध्ये सहा जिन्नस मिळणार आहे. आनंदाचा शिधा म्हणून गोरगरीब जनतेला गणेशोत्सवाच्या काळात शंभर रुपयांमध्ये प्रत्येकी १ किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे.

यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये गरीब, गरजवंत रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळणार अशी आशा आहे. पण आनंदाचा शिधा वाटप योजना जाहीर झाली खरी, मात्र आनंदाचा शिधा प्रत्यक्षात रेशन कार्डधारकांना कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय.

Advertisement

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा आनंदाचा शिधा पुढील महिन्यापासून वितरित होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेपासून ते सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *