Maharashtra Banking News : आरबीआय ही भारत सरकारने स्थापित केलेली देशातील बँकिंग नियामक संस्था आहे. या संस्थेचे देशातील खाजगी, सहकारी आणि पब्लिक सेक्टर मधील बँकांवर नियंत्रण आहे. देशातील बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते.
ज्या बँका या नियमांचे पालन करत नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा अधिकार आरबीआयला असतो. दरम्यान सेंट्रल बँकेच्या माध्यमातून अर्थातच आरबीआयच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत आरबीआयने देशातील काही प्रमुख सरकारी बँकांवर लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे सध्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआयने अशीच कारवाई केली होती. त्यामध्ये काही बँकांवर दंडात्मक कारवाई झाली होती तर काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहेत.
अशातच आता काल अर्थातून 18 जानेवारी 2024 रोजी आरबीआयने देशातील चार बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेचा देखील समावेश होतो.
आरबीआयकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबई स्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरीक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीत वसलेल्या न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक या सहकारी बँकेला आरबीआय ने 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तसेच गुजरातमधील मेहसना सहकारी बँकेला 7 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मात्र आरबीआयच्या या दंडात्मक कारवाईमुळे सदर बँकेच्या खातेधारकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही.
हा दंड बँकेला भरायचा असून ग्राहकांकडून कोणत्याच प्रकारचा दंड वसूल होणार नाही अशी माहिती आरबीआयकडून मिळालेली आहे. यामुळे सदर बँकेतील खातेधारकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे जाणकार लोक सांगत आहेत.