Maharashtra Cyclone Latest Update : सध्या महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये दुपारच्या कमाल तापमानात मोठी वाढ होत आहे. त्याचवेळी सकाळी तापमानात मोठी घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. ऑक्टोबर हिट मुळे बेजार झालेली जनता देखील आता थंडीची आतुरतेने वाट पाहत आहे.
जोरदार थंडीला केव्हा सुरुवात होणार हा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच अरबी समुद्रात तेज नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात देखील हुमन नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे हवामान खात्याने नुकतेच जाहीर केले आहे.
या आधी 2018 मध्ये एकाच वेळी दोन चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. आता 2018 नंतर प्रथमच असा प्रसंग तयार झाला आहे. दरम्यान, दोन चक्रीवादळाची निर्मिती झाली असल्याने या चक्रीवादळावर आपल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने या दोन्ही चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर आणि संपूर्ण देशावर काय परिणाम होऊ शकतो याबाबत विस्तृत अशी माहिती जारी केली आहे. चला तर मग या दोन्ही चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार हे थोडक्यात समजून घेऊया.
तेज चक्रीवादळाचा काय परिणाम होणार
तेज चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले असल्याने या वादळामुळे सुरुवातीला कोकण किनारपट्टीसह राजधानी मुंबई आणि गुजरात किनारपट्टीला धोका पोहोचेल असे सांगितले जात होते. परंतु त्याच्या चक्रीवादळाच्या दिशेत अचानक मोठा बदल झाला आहे. हे वादळ आता येमन किंवा ओमान देशाच्या किनारी भागाकडे सरकत चालले आहे.
यामुळे या वादळाचा आपल्या महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्र शेजारील गुजरात राज्यावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे बोलले जात आहे. हे चक्रीवादळ आता 24 ऑक्टोबर च्या सुमारास यमन किंवा ओमान येथे धकडकणार आहे.
एकंदरीत तेज चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला आणि गुजरातला कोणताच धोका नाही. यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे काही कारण नाही. तथापि या वादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. केरळ आणि तामिळनाडूत पाऊस पडू शकतो असे सांगितले जात आहे.
हमून चक्रीवादळाचा काय परिणाम होणार ?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘हमून’ हे आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार झाले आहे. दरम्यान हे चक्रीवादळ हळूहळू आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकत आहे. दरम्यान या देखील चक्रीवादळांचा देशावर फारसा मोठा परिणाम होणार नाही.
या 2 चक्रीवादळाचा मोठा प्रभाव भारतावर पडणार नसला तरी ओडिसा आणि बंगालमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज आहे. तसेच जर ‘हमून’ चक्रीवादळाच्या दिशेत बदल झाला तर तामिळनाडूच्या चेन्नई किनारपट्टीवर देखील वातावरणात अचानक बदल होऊ शकतो अशी माहिती हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.