Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही काही महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्गासारखा हायटेक महामार्ग देखील आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असून याची लांबी 701 किलोमीटर एवढी आहे.
आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. विशेष म्हणजे उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. तसेच राज्यात नजीकच्या भविष्यात आणखी अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण होणार आहेत.
हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग येत्या काळात पूर्णत्वास येणार आहेत. दरम्यान आज आपण देशातील सर्वात महाग महामार्गाची माहिती पाहणार आहोत. खरे तर महामार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना टोल भरावा लागतो.
जवळपास सर्वच महामार्गांवर टोल आकारला जात असतो. पण तुम्हाला सर्वात जास्त टोल कोणत्या महामार्गावर आकारला जातो याविषयी माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत.
देशातील सर्वात महाग एक्सप्रेसवे कोणता?
देशातील सर्वात महाग एक्सप्रेसवे म्हणून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला ओळखले जाते. हा देशातील सर्वात जुन्या एक्सप्रेस वे पैकी एक आहे. हा हिंदुस्थानातील पहिलाचं प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वे मानला जातो. 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हा मार्ग बांधला होता.
हा रस्ता मुंबई आणि पुण्याला जोडतो. हे दोन्ही शहरे महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त शहरे आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा देशातील पहिला 6 लेन म्हणजे सहापदरी रस्ता देखील आहे.
पण या महामार्गाने प्रवास करतांना देशातील इतर महामार्गांच्या तुलनेत अधिक टोल भरावा लागतो. या एक्स्प्रेस वे वर कार चालकाला इतर रस्त्यांपेक्षा प्रति किलोमीटर सुमारे एक रुपये जास्त टोल द्यावा लागतो. यामुळे या महामार्गाला देशातील सर्वात महाग महामार्ग म्हणतात.
हा एक्सप्रेस वे जवळपास दोन दशकांपूर्वी म्हणजेच 22 वर्षांपूर्वी बांधला गेला आहे. या मार्गाची लांबी 94.5 किलोमीटर एवढी आहे. यामुळे मुंबई ते पुणे असा प्रवासाचा कालावधी दोन तासांनी कमी झाला आहे. या महामार्गामुळे तीन तासांचा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करता येत आहे.