Maharashtra Expressway : सध्या महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये रस्ते विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. मुंबईमध्ये देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. हा प्रकल्प मुंबई ते उरण अर्थातच नवी मुंबई हा प्रवास निम्म्यावर आणणारा प्रकल्प आहे.
या प्रकल्पांतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान सागरी सेतू अर्थातच सी ब्रिज विकसित केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा सागरी सेतू किंवा समुद्र पूल देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू राहणार आहे. म्हणजेच देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू हा आपल्या महाराष्ट्रात बिल्डअप होणार आहे.
निश्चितच ही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बाब आहे. हा प्रकल्प मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी खूपच मोलाचा ठरणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. आधी या प्रकल्पाचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात होते.
मात्र अद्याप या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे हा प्रकल्प केव्हा सुरू होणार हा सवाल मुंबईकरांच्या आणि नवी मुंबईकरांच्या माध्यमातून यावेळी उपस्थित केला जात आहे. अशातच मात्र या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
आतापर्यंत या प्रकल्पाचे किती काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम किती कालावधीत पूर्ण होऊ शकते याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 22 किलोमीटर लांबीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आगामी काही महिन्यात सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत 22 किलोमीटर लांबीचा ब्रिज तयार केला जात असून यापैकी 16.5 km लांबीचा ब्रिज हा समुद्रावर राहील तर 5.5 किलोमीटर लांबीचा ब्रिज जमिनीवर राहणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा देशातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल म्हणून ओळखला जाणार असून या सागरी सेतुवर दिवसाला 70 हजार वाहने प्रवास करतील असा अंदाज आहे.
सध्या स्थितीला या प्रकल्पांतर्गत विकसित होणारे व्हायाडक्ट आणि बॅरिअरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच आता डांबरीकरण, लाईट पोल बसवणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि टोल इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या कामांकडे मोर्चा वळवण्यात आला आहे.
एमएमआरडीए अर्थातच मुंबई मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरिटीने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्पात लक्षणीय अशी प्रगती केली असून आत्तापर्यंत या प्रकल्पाचे 96% पेक्षा अधिकचे काम पूर्ण झाल्याची नवीन माहिती समोर आली आहे. तसेच उर्वरित कामे देखील युद्ध पातळीवर सुरू आहेत. यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
यासोबतच चिरले ते एक्सप्रेस वे दरम्यान कनेक्टर तयार करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करण्याची प्रक्रिया देखील सध्या प्रगतीपथावर आहे. लवकरच यासाठी देखील कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती होणार आहे आणि हे देखील काम लवकर सुरू होईल अशी आशा आहे. दरम्यान एमटीएचएलवरील टोल इन्फ्रास्ट्रक्चरची कामे देखील जवळपास निम्म्याहून अधिक पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे आता हा प्रकल्प नवीन वर्षात का होईना पण मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असा आशावाद जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. यामुळे आता हा प्रकल्प नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी सुरू होतो का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.