Maharashtra Ghat Marg Closed : राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागाला जोडणारा राज्यातील एक महत्त्वाचा घाट मार्ग 31 ऑगस्ट पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोकणातील रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला जोडणी देणारा वरंधा घाट मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

खरंतर पुण्यातील पर्यटक दररोज मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढत असते. हे सर्व पर्यटक वरंधा घाट मार्गे प्रवास करतात. रायगड जिल्ह्यातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पुण्यात कामानिमित्त वरंधा घाट मार्गे प्रवास करत असतात.

Advertisement

पुणे आणि रायगडला जोडणारा हा मार्ग सर्वात सोयीचा आणि जवळचा आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक असते. मात्र हा घाट मार्ग पावसाळ्याच्या कालावधीत खूपच धोकादायक बनतो. यंदाही अशीच परिस्थिती आहे. जोरदार पावसामुळे घाट मार्गातील रस्ता खचला आहे.

यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता खूपच अरुंद झाला असून यावरून वाहतूक सुरू ठेवणे हे खूपच धोकादायक आहे. खरे तर या घाटमार्गात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत.

Advertisement

यामुळे जिवीत व वित्तहानी देखील झाली आहे. दरम्यान, अशीच घटना या पावसाळ्यातही होऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हलकी, जड-अवजड अशी कोणत्याच प्रकारची वाहतूक या मार्गाने करता येणार नाही.

हा घाट मार्ग 31 ऑगस्ट पर्यंत बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हाधिकारी महोदयांनी घेतला आहे. मात्र असे असतानाही अनेकजण या निर्णयाची पायमल्ली करत असल्याचे उघड झाले आहे. अनेक जण घाटमार्ग बंद असतानाही जीव धोक्यात घालून घाटातून प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Advertisement

प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. यामुळे आता रायगड जिल्हा प्रशासनाने यावर एक तोडगा काढला आहे. अखेर प्रशासनाने घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्याची बॉर्डर असलेल्या ठिकाणच्या रस्त्यावर JCB च्या सह्याने मोठं मोठे दगड आणि बॅरिगेट्स लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

कोणत्याच प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर चढता येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यामुळे भविष्यात या घाट मार्गावरून कोणालाच प्रवास करता येणार नाही आणि यामुळे अनुचित घटना घडणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *