Maharashtra Government Employee News : येत्या सात दिवसात दिवाळीचा सण सुरू होणार आहे. यंदा 10 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीचा आनंददायी पर्व साजरा केला जाणार आहे. दरम्यान या आनंददायी सणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने राज्यातील एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 378 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
यामुळे दिवाळीच्या काळात या संबंधित कामगारांचे वेतन वेळेवर होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे यंदा या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तरी वेळेवर वेतन मिळणार आणि आनंदात सण साजरा करता येणार असे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
खरंतर गेल्या काही वर्षांपासून एसटी कर्मचारी शासनाच्या धोरणावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यंतरी एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देखील दिले जात नव्हते. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या इतरही प्रलंबित मागण्या शासनाकडून मान्य केल्या जात नव्हत्या.
यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजीचे सुर उमटत होते. ही नाराजी मात्र सरकारला निवडणुकीच्या काळामध्ये महाग पडण्याची शक्यता वाटत होती.
हेच कारण आहे की सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सण अग्रीम म्हणून 12500 देण्याचा नुकताच मोठा निर्णय घेतला आहे.
याशिवाय आता एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे यासाठी सरकारच्या माध्यमातून 378 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामुळे आता येत्या तीन ते चार दिवसात संबंधितांना वेतन मिळेल असे सांगितले जात आहे.
निश्चितच शिंदे सरकारने घेतलेला हा निर्णय या संबंधित नोकरदार वर्गासाठी विशेष खास राहणार असून यामुळे त्यांची यंदाची दिवाळी आनंदात जाणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
दरम्यान शासनाच्या या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील स्वागत केले जात आहे. कर्मचारी संघटनांनी शासनाने घेतलेला हा निर्णय संबंधितांसाठी दिलासा देणार ठरणार असे सांगितले आहे.