Maharashtra Government Scheme : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक युवकांना नोकरी लागत नाहीये. महाराष्ट्रात तर अशा बेरोजगार युवकांची संख्या खूपच अधिक आहे. यामुळे बेरोजगार युवकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एका अतिशय महत्त्वाच्या योजनेची सुरवात केली आहे. राज्य शासनाने राज्यातील बेरोजगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना सुरू केली आहे. या बेरोजगार भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार नवयुवकांना मासिक पाच हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यातून राज्यातील बेरोजगारांना मोठा दिलासा मिळत आहे. निश्चितच महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली ही योजना राज्यातील बेरोजगारांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप आणि या योजनेसाठी कोणते बेरोजगार पात्र राहणार याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार योजनेचे स्वरूप?
खरंतर वाढती लोकसंख्या आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे आता अनेक उच्चशिक्षित तरुणांना देखील नोकरी मिळत नाहीये. यांत्रिकीकरणामुळे दहा माणसांचे काम केवळ एक माणूस करत आहे. हेच कारण आहे की आता मनुष्यबळाची कमी गरज भासू लागली आहे.
विशेष म्हणजे आगामी काळात माहिती तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे आणि एआय सारख्या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात नोकर कपात होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात आलेल्या तोट्यामुळे अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या कंपनीतून मोठ्या प्रमाणात नोकर कपात देखील केली आहे. यामुळे बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत आहे.
म्हणून राज्यातील बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य बेरोजगार भत्ता योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपये पात्र बेरोजगारांना दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे दरमहा दिले जाणारे हे पाच हजार रुपये जोपर्यंत सदर बेरोजगाराला नोकरी लागत नाही तोपर्यंत मिळत राहणार आहे.
कोणते युवक राहणार पात्र?
- या बेरोजगारी भत्त्याचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदार कोणत्याही सरकारी, निमसरकारी नोकरीं किंवा व्यवसाय करणारा नसावा.
- अर्जदाराकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसावे.
- अर्जदाराचे वय 21 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त राहता कामा नये.
- तसेच हा बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.