Maharashtra Government Scheme : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या निकालात भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे.
पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले आहे. छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने बहुमत मिळवले असून आपल्या विजयाची घोडदौड अबाधित ठेवली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसने केवळ एका राज्यात सत्ता स्थापित केली आहे. काँग्रेसने तामिळनाडूमध्ये बहुमत मिळवले आहे. दरम्यान मध्य प्रदेश मध्ये भाजपाला तेथील शिवराज सरकारने सुरू केलेल्या लाडली बहना योजनेमुळे पुन्हा एकदा सत्ता काबीज करता आली अशा चर्चा सुरु आहेत.
जाणकार लोक देखील या गोष्टीला दुजोरा देत आहेत. या योजनेचा मध्य प्रदेश मधील सव्वा कोटी महिलांना फायदा होत आहे. या योजनेमुळेच मध्य प्रदेश मध्ये भाजपाचे सरकार आले असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे आता आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा काळ पाहता राज्यातील शिंदे सरकार देखील ही योजना महाराष्ट्रात राबवण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले जात आहेत.
जरा शिंदे सरकारने ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील महिलांना सुद्धा वर्षाकाठी 12 हजार रुपये मिळणार आहेत.
यामुळे आता आपण मध्यप्रदेश मध्ये राबवले जाणारी ही योजना नेमकी आहे तरी कशी याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
लाडली बहना योजनेचे स्वरूप कसे आहे ?
लाडली बहना योजनेअंतर्गत महिलांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या पालनपोषणासाठी प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये दिले जातात. मध्यप्रदेश राज्यातील सव्वा कोटी महिलांना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला एक हजार म्हणजेच वर्षासाठी 12 हजार रुपये दिले जात आहेत.
यासाठी मध्यप्रदेश राज्य सरकार बजेटमध्ये 12000 कोटी रुपयांची तरतूद करत आहे. या योजनेचा 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना लाभ दिला जात आहे.
मात्र या योजनेचा शाळा तसेच महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना आणि महिलांना लाभ दिला जात नाही. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे.