Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. नाशिक मध्ये तर निओ मेट्रोचा प्रकल्प देखील राबवण्याचा प्लॅन आहे. दरम्यान देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील मेट्रो संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकरांना लवकरच आणखी एका नवीन मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या राजधानीत मेट्रो लाइन 3 चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
दरम्यान याच मार्गाचा पहिला टप्पा या मे अखेरपर्यंत म्हणजेच मे 2024 अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येणार अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे. खरंतर गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्याच्या 12 तारखेला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स (BKC) या मार्गावरील मेट्रोची एक चाचणी घेतली आहे.
परिणामी आता मे महिन्यांच्या अखेरीस मेट्रो-3 प्रकल्प सुरू होणार असे बोलले जात आहे. मुंबईकरांना देखील तशीच आशा आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आरे-बीकेसी पहिल्या टप्प्यातील काम 94.7 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती दिलेली आहे.
अर्थातच या पहिल्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून हा पहिला टप्पा लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. यामुळे मुंबईमधील जनतेचा प्रवास जलद होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
मुंबईमधील मेट्रो तीन बाबत बोलायचं झालं तर हा कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 प्रकल्प मुंबईमधील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प आहे. या मार्गिकेतील पहिले स्थानक हे कफ परेड तर शेवटचे स्थानक आरे आहे. या मार्गिकेवर एकूण 26 स्थानके आहेत. यापैकी आरे हे एकमात्र स्थानक जमिनीवर राहणार आहे.
उर्वरीत सर्व स्थानके हे भूमिगत राहणार आहेत. यामुळे हा मुंबई मधला पहिला भूमिगत मेट्रो मार्ग प्रकल्प ठरणार आहे. विशेष बाब अशी की राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यात देखील लवकरच भूमिगत मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या पुढील विस्तारित मेट्रो मार्ग अर्थातच सिविल कोर्ट ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रो मार्ग येत्या काही महिन्यात सर्वसामान्यांसाठी सुरू होणार अशी माहिती महा मेट्रोच्या माध्यमातून समोर आलेली आहे.
दरम्यान राजधानी मुंबई मधील बीकेसी ते आरे हा मुंबईतल्या मेट्रो मार्ग तीन प्रकल्पाचा पहिला टप्पा मे अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येण्याची दाट शक्यता आहे.
या पहिल्या टप्प्यात आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ, सहार रोड, विमानतळ टर्मिनल, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी ही मेट्रो स्थानके राहणार आहेत. हा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर या मेट्रोने जवळपास 17 लाख प्रवासी प्रवास करतील अशी आशा व्यक्त होत आहे.