Maharashtra New Bus Station : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाचा आणि प्रशासनाचा विशेष जोर असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये काही नवीन बसस्थानकांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. नाशिक मध्ये राज्यातील पहिले एसी बस स्थानक तयार झाले आहे.
दुसरीकडे बारामती येथे दुमजली बस स्थानक तयार करण्यात आले आहे. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यात एक नवीन बसस्थानक तयार होणार असल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुरी येथे नवीन बस स्थानक तयार होणार आहे.
यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. राहुरी बसस्थानकातून ये-जा करणाऱ्या लाल परीच्या प्रवाशांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास आरामदायी होईल अशी आशा या निमित्ताने प्रवाशांच्या माध्यमातून देखील व्यक्त होऊ लागली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 25 मे 2024 ला राहुरी येथील बसस्थानकाला 51 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्याच्या या स्थानकाचे 25 मे 1973 ला उद्घाटन करण्यात आले होते. हे बस स्थानक जिल्ह्यातील सर्व सुविधांनी युक्त असे स्थानक म्हणून ओळखले जात असे.
भव्य कॅन्टीन, पिण्याचे पाणी, जनरल स्टोअर्स, तिकीट काउंटर, स्वच्छतागृह आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने हे या स्थानकाचे वैशिष्ट्य होते. आता मात्र या स्थानकाला 50 वर्षांपेक्षा जास्तीचा काळ पूर्ण झाला आहे. यामुळे या बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बसस्थानकाच्या उत्तरेला नियंत्रण कक्षासह प्रवाशांसाठी शेडचे काम सुरू असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. तसेच, लवकरच बसस्थानकाच्या भव्य आणि दिव्य इमारतीचे काम सुरू होणार असाही आशावाद व्यक्त होऊ लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राहुरी येथे विकसित होणाऱ्या या नवीन बसस्थानकाचा आराखडा तयार असून बसस्थानकातील नियोजित दहा प्लॅटफॉर्मशिवाय अधिकचे दोन ते तीन प्लॅटफॉर्म वाढविण्यात येणार आहेत.
यामुळे या भागातील एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. राहुरी तालुक्याचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. यामुळे राहुरी शहरात अद्ययावत अन मोठे बसस्थानक असणे अनिवार्य आहे.
याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता भव्य-दिव्य बसस्थानकाची निर्मिती केली जाणार आहे. तथापि या बसस्थानकाचा प्रश्न मोठ्या काळापासून प्रलंबित आहे. त्यामुळे या बसस्थानकाची पुनर्बांधणी नेमकी कधी होणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.