Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यातील पायाभूत सुविधा सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रामुख्याने रस्त्यांचे जाळे विकसित करण्यावर सरकारचा जोर आहे. आतापर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात महामार्गांचे हजारो किलोमीटर लांबीचे जाळे विकसित करण्यात आले आहे.
अजूनही काही प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्ग प्रकल्प हा देखील असाच एक शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पा अंतर्गत मुंबई ते नागपूर दरम्यान महामार्ग विकसित केला जात आहे.
या महामार्गाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे. आत्तापर्यंत या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे 625 किलोमीटर एवढे काम पूर्ण झाले असून यावरून वाहतूक देखील सुरू झाली आहे. स
मृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. यानंतर गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये या महामार्गाचा 80 किलोमीटर लांबीचा म्हणजेच शिर्डी ते भरवीर हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
या चालू वर्षी अर्थातच 2024 मध्ये समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. म्हणजेच आतापर्यंत महामार्गाचे तीन टप्पे सुरू झाले आहेत. आता या मार्गाचा चौथा टप्पा सुरु होणे बाकी आहे.
समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत या महामार्गाचा चौथा टप्पा सुरू होऊ शकतो.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या टप्प्याचे 90 टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे. या चौथ्या टप्प्या अंतर्गत विकसित होत असलेल्या खर्डी पुलाचे काम थोडेसे आव्हानात्मक आहे. तथापि सध्या या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरात लवकर याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
समृद्धी महामार्ग हा सहा पदरी आहे. मात्र या खर्डी पुलावर फक्त चार लेन आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे शेवटच्या टप्प्याचे संपूर्ण काम ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र खर्डी पूलाचे काम बाकी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत खर्डी पूलाच्या दोन लेनचे काम पूर्ण होणार आहे.
यानंतर नोव्हेंबर 2024 पर्यंत खर्डी पुलाच्या उर्वरित मार्किका सुरू केल्या जाणार आहेत. एकंदरीत संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होण्यासाठी नोव्हेंबर 2024 पर्यंत वाट पहावी लागू शकते.
तथापि, या चौथ्या टप्प्यातील बहुतांशी काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण होणार असल्याने ऑगस्ट महिन्यापासून खर्डी पुलाच्या दोन मार्गीकासह यावरून वाहतूक सुरू होऊ शकते असे चित्र सध्या तरी भासत आहे.