Maharashtra New Expressway : राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी गुड न्युज समोर येत आहे. राज्यात दोन नवीन एक्सप्रेस वे ची बांधणी केली जाणार आहे. पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलेल्या सरकारने आता मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई हा प्रवास गतिमान व्हावा यासाठी दोन नवीन महामार्गांची उभारणी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
या महामार्गांमुळे भविष्यात कोकणातील चाकरमान्यांना मुंबईहून आपल्या मूळ गावी परतताना मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे.
यामुळे कोकणातील नागरिकांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळाली आहे. जेव्हाही होळी, गणपती, दिवाळी असे सण येतात आणि चाकरमाने आपल्या मूळ गावाकडे प्रस्थान करतात तेव्हा त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
कारण की अशा वेळी प्रवाशांची संख्या वाढलेली असते आणि रस्ते खराब असल्यामुळे चाकरमान्यांना आपल्या मूळ गावाकडे जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
आता मात्र मुंबई ते कोकण हा प्रवास खूपच आरामदायी होणार आहे. यामुळे मुंबई ते कोकण असा दररोज जरी प्रवास केला तरी देखील चाकरमान्यांना अडचण भासणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील चाकरमान्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुंबई-गोवा द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा सागरी किनारा मार्ग हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
या प्रकल्पांचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जाणार आहे. दरम्यान आता आपण हे प्रकल्प नेमके कसे राहणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई-गोवा द्रुतगती महामार्ग
लांबी – 388 किमी
कोण काम पाहणार – राज्य रस्ते विकास महामंडळ
रूट कसा राहणार – नवी मुंबईतील पनवेल ते गोवा सीमेवरील पत्रादेवी
प्रवासासाठी किती तास लागणार – या महामार्गामुळे पनवेल ते पत्रादेवी हा प्रवास तीन तासात होणार आहे. सध्या यासाठी 8 तास लागत आहेत.
किती जागा संपादित करावी लागणार ? – 4205.21 हेक्टर
प्रकल्पाचा खर्च – 25 हजार कोटी
मुंबई ते गोवा सागरी मार्ग
महामार्गाची लांबी किती राहणार ? – 500 किमी
रूट कसा राहणार ? – रेवस ते रेड्डी
प्रकल्पाचा खर्च – 10 हजार कोटी
प्रकल्पाची सद्यस्थिती – पुलाच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे.