Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहे. विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही राज्यात अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत.
समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग असून या मार्गाचे काम 600 किलोमीटर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून यावर सध्या वाहतूकही सुरू आहे.
विशेष म्हणजे या मार्गाच्या उर्वरित टप्प्याचे काम देखील जलद गतीने सुरू आहे. सध्या नागपूर ते भरवीर हा समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे.
भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा देखील टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
दुसरीकडे इगतपुरी ते आमने पर्यंतच्या 76 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम जलद गतीने सुरू असून लवकरात लवकर हा देखील टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार अशी आशा आता व्यक्त होत आहे.
याशिवाय राज्यात नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम देखील सुरू होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या मार्गाच्या अंतिम आखणीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच कल्याण ते लातूर दरम्यान नवीन महामार्ग तयार होणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाकडून लवकरच राज्य शासनाकडे पाठवला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
अशातच मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यानुसार महाराष्ट्राला आणखी एका महामार्गाची भेट मिळणार हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर ते टेंभुर्णी रस्त्याची मलाच लाज वाटत असल्याचे म्हटले आहे.
तसेच मार्गाचे लवकरच चौपदरीकरण केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे लातूर ते टेंभुर्णी हा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुलभ होईल अशी आशा व्यक्त होत आहे.