Maharashtra New Expressway Toll Rate : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई शहरातही गेल्या काही वर्षात रस्त्यांची आणि रेल्वेची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राजधानीतील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजधानीमधील दळणवळण व्यवस्था यामुळे आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे यात शंकाच नाही.
राजधानीत दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. याशिवाय रस्त्यांचे नेटवर्क देखील स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या सागरी रस्त्याला भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांचे नाव देण्यात आले आहे.
हा अटल सेतू नुकताच सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे. याचे उद्घाटन काल अर्थातच 12 जानेवारी 2023 ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.यामुळे मुंबईकरांना गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या मार्गाची आतुरता लागलेली होती तो मार्ग आता सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.
खरे तर हा मार्ग म्हणजेच अटल सेतू माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीदिनानिमित्त अर्थातच 25 डिसेंबर 2023 ला सुरू केला जाणार होता.मात्र नियोजित वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही, म्हणून याचे गेल्यावर्षी उद्घाटन झाले नाही. दरम्यान काल या प्रकल्पाचे उद्घाटन झाले असून आजपासून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.
खरे तर सध्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त वीस ते पंचवीस मिनिटात पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई ते पुणे हा प्रवास देखील फक्त 90 मिनिटात पूर्ण होणार अशी आशा आहे. मात्र असे असले तरी या मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठा टोल भरावा लागणार आहे.
या मार्गावरील टोल कार्ड नुकतेच समोर आले आहे. यानुसार या मार्गावरून जाणाऱ्या काही गाड्यांना तब्बल महिन्याला 79 हजार रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हे टोल कार्ड पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण या मार्गावर प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनांना किती टोल भरावा लागणार या विषयी जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या मार्गावरून प्रवास करण्यासाठी काही वाहनांना प्रतिबंध देखील राहणार आहे यामुळे आज आपण याचीही माहिती पाहणार आहोत.
किती टोल भरावा लागणार ?
अटल सेतू शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान विकसित झाला आहे. हा मार्ग एकूण 22 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 16.5 किलोमीटर लांबीचा अंतर हे समुद्रावरील आहे. विशेष म्हणजे उर्वरित मार्ग हा जमिनीवर तयार करण्यात आला आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा दोन तासांचा प्रवास फक्त वीस मिनिटात पूर्ण होईल असा दावा होत आहे.
या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकणार आहेत. या सर्व वाहनांसाठी मात्र वेगवेगळा टोल राहणार आहे. विशेष बाब अशी की टोलसाठी सिंगल, रिटर्न, डेली आणि मासिक पास सुद्धा उपलब्ध करुन दिला जणार आहे. त्यानुसार कार साठी सिंगल टोल हा 250 रुपयाचा राहणार आहे.
तसेच कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा आणि अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपयाचा आणि या अवजड वाहनांना जर मासिक पास काढायचा असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मोटर सायकल, मोपेड, तीन चाकी टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रॉलीला या मार्गावर चालवता येणार नाही. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर प्रतिबंध राहणार आहे.