Maharashtra New Expressway : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्ते विकासाच्या कामांमुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी ही खूपच सक्षम बनली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत म्हणजे मुंबईमध्ये देखील अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूचं आहेत.

विशेष म्हणजे आज आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे ते बोरिवली दरम्यानच्या दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन होणार आहे. या दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास खूपच जलद होईल अशी आशा आहे.

Advertisement

या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याला जोड मिळणार आहे. यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हा भुयारी मार्ग प्रकल्प विकसित करण्यासाठी तब्बल 16,600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत 10.25 किलोमीटर लांबीचे बोगदे तयार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे हा भारतातील सर्वाधिक लांबीचा भुयारी मार्ग राहणार आहे.

Advertisement

या प्रकल्पांतर्गत दोन जुळे बोगदे तयार होणार असून प्रत्येक बोगद्यात दोन मार्गिका राहणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली या दरम्यानचा प्रवास अवघ्या बारा मिनिटांच्या कालावधीत पूर्ण होईल असा दावा जाणकार लोकांनी केला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या ठाणे ते बोरिवली हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास सव्वा ते दीड तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. म्हणजेच दीड तासांचा प्रवास या प्रकल्पामुळे अवघ्या बारा मिनिटांवर येणार आहे.

Advertisement

साहजिकच, ठाणे ते बोरिवली दरम्यान चा प्रवास हा खूपच सुपरफास्ट होणार आहे आणि यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असले तरी देखील या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे.

आज 13 जुलैला या प्रकल्पाच भूमिपूजन होईल. पावसाळा संपल्यानंतर अर्थातच सप्टेंबरनंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल. तसेच, 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

कसा आहे प्रकल्प?

या संपूर्ण प्रकल्पाची लांबी 11.8 किलोमीटर एवढी आहे. यामध्ये प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी दोन जुळे बोगदे राहणार आहेत. बोगद्यांची लांबी ही 10.25 किलोमीटर एवढी असेल. 1.55 किलोमीटर लांबीचे पोहोच मार्ग राहणार आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रत्येकी दोन मार्गिका विकसित होणार आहेत.

Advertisement

यामुळे बोरिवली ते ठाणे हा प्रवास अवघ्या बारा मिनिटांवर येणार असून प्रवासाचा जवळपास सव्वा तासांचा कालावधी वाचणार आहे. यामुळे पूर्व ते पश्चिम हा प्रवास सिग्नल विना पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यास सक्षम ठरणार आहे. सोबतच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी देखील यामुळे फुटणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *