Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या कामात नेत्र दीपक अशी प्रगती पाहायला मिळाली आहे. राज्यात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. अशातच राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात आता दोन नवीन महामार्ग तयार होणार आहेत.
या महामार्गांमुळे नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई ते कोकण अन गोवा हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी दोन नवीन मार्ग तयार होणार आहेत.
कोकण द्रुतगती महामार्ग आणि कोकण सागरी किनारा मार्ग असे हे दोन महामार्ग राहणार आहेत. यामुळे भविष्यात मुंबई ते कोकण तथा गोवा हा प्रवास जलद होणार आहे. कोकणातील प्रवाशांना या महामार्गाचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे.
कसे राहणार रोड ?
खरतर सध्या स्थितीला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जातोय.
हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.
उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा मार्ग देखील जुलै 2024 मध्ये सुरू होईल अशी आशा आहे. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास लवकरच जलद होणार आहे. या महामार्गाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे.
दरम्यान याच महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोवा कोकण द्रुतगती महामार्ग तयार आहे. हा एक सहा पदरी महामार्ग राहणार आणि याची लांबी 388 किलोमीटर लांबीची राहणार आहे.
हा मार्ग नवी मुंबईतील पनवेल येथून सुरु होणार आहे. तसेच हा रस्ता गोवा-महाराष्ट्र सीमेवर येऊन संपणार आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा पाच तासांचा कालावधी वाचणार आहे. सध्या मुंबई ते गोवा राज्याची सीमा या प्रवासासाठी आठ तासांचा कालावधी लागत आहे.
मात्र ज्यावेळी हा महामार्ग पूर्णपणे डेव्हलप होईल तेव्हा हा प्रवास फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 25 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याशिवाय मुंबई ते गोवा हा प्रवास जलद व्हावा यासाठी रेवस ते रेडी दरम्यान कोकण सागरी मार्ग विकसित केला जाणार आहे.
हा मार्ग 498 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तथापि या दोन्ही प्रकल्पाच्या कामासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.