Maharashtra New Railway : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय लोकल मध्ये देखील मोठी गर्दी पाहायला मिळते.
लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. पण आता येथेही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी होऊ लागली आहे. मुंबई शहराजवळील अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वे स्थानकांवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
दरम्यान याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या माध्यमातून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या मध्यात एक नवीन रेल्वे स्थानक तयार केले जाणार आहे.
चिखलोली येथे नवीन रेल्वे स्थानक तयार होणार असून याच नवीन मध्य रेल्वेच्या स्थानकासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या नव्याने विकसित होत असलेल्या रेल्वे स्थानकासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 73.928 रुपयांचे टेंडर एका कंपनीला देण्यात आले असून याचे कार्यादेश देखील निघाले आहेत.
यामुळे लवकरच या रेल्वेस्थानकाच्या कामाला सुरुवात होणार आहे. विष्णू प्रकाश पुंगलिया या कंपनीला हे टेंडर मिळाले असून लवकरच याचे बांधकाम सुरू होणार अशी आशा आहे.
रेल्वे स्थानकात जिने, पूल आणि जमिनीच्या कामासाठी ही निविदा ऑक्टोबर 2023 मध्ये प्रकाशित करण्यात आले.
त्यानुसार अखेरकार ही निविदा प्रक्रिया संपुष्टात आली असून आता नियुक्त कंपनीला कार्यादेश देण्यात आले आहे.
यामुळे येत्या काही दिवसात या नवीन रेल्वे स्थानकाचे काम सुरू होणार आणि लवकरच हे रेल्वे स्थानक तयार होऊन प्रवाशांच्या सेवेत येणार अशी आशा आहे.
दरम्यान हे स्थानक पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर या मध्य रेल्वे मार्गावरील दोन अतिशय महत्त्वाच्या स्थानकावरील भार कमी होईल, असा दावा तज्ञांनी केला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास निश्चितच आरामदायी आणि जलद होणार आहे यात शंकाच नाही.