Maharashtra News : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील नागरिकांना ग्रामपंचायतीत उपलब्ध होणारे सर्व प्रकारचे दाखले घरबसल्या काढता येणार आहेत. खरंतर आपल्याला जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंद दाखला यांसारख्या अनेक महत्त्वाच्या दाखल्यांची गरज भासते.
हे सर्व दाखले काढण्यासाठी मात्र ग्रामपंचायतीत जावे लागते. अशा परिस्थितीत जर कोणी गावाबाहेर राहत असेल तर अशा नागरिकांना हे दाखले काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. मात्र आता ही मेहनत घेण्याचे काहीच काम नाही. कारण की हे दाखले आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एका अँप्लिकेशनची निर्मिती केली आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता राज्यातील नागरिकांना ग्रामपंचायतीत उपलब्ध होणारे वेगवेगळे महत्त्वाचे दाखले एका क्लिकवर काढता येणार आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या दाखल्यांसाठी विकसित केलेल्या या एप्लीकेशन बाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणते आहे हे अँप्लिकेशन
मित्रांनो जर आपल्याला जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंद प्रमाणपत्र, पाणीपट्टी, घरपट्टी अशा प्रकारची काही कागदपत्रे शासकीय कामांसाठी लागलीत तर आता आपल्याला ही सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये न जाता देखील मिळवता येणार आहेत. आतापर्यंत ही कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक आणि सरपंचाशी संपर्क साधावा लागत होता.
मात्र आता ही सर्व कागदपत्रे मोबाईलवर तेही अगदी दोन मिनिटाच्या कालावधीत काढता येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामपंचायतच्या दाखल्यांसाठी महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट एम्पोवरिंग महाराष्ट्र नामक एप्लीकेशन लॉन्च केले आहे.
या ॲप्लिकेशनच्या मदतीने ग्रामपंचायतीत उपलब्ध होणारे सर्वच प्रकारचे दाखले घरबसल्या काढता येणार आहेत. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मधून महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.
हे एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशन मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्ही एप्लीकेशनचा वापर करून ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध होणारे सर्व प्रकारचे दाखले अगदी एका मिनिटात काढू शकता.