Maharashtra News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच एक फेब्रुवारी 2024 ला केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांनी सलग सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता वेगवेगळ्या राज्यांमधील, राज्य शासनाकडून राज्य अर्थसंकल्प सादर केले जात आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील अर्थसंकल्प नुकतेच सादर झाले आहेत.
दुसरीकडे आता महाराष्ट्रात देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झाल्यानंतर येत्या काही दिवसात लगेचच लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत.
यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा होण्याची शक्यता तज्ञांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.
दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार मध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर हा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प अधिवेशन राहणार आहे.
यंदाचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार मांडणार आहेत. यामध्ये पवार अनेक महत्त्वाच्या घोषणा करतील असे बोलले जात आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय या बजेटमध्ये घेतले जाऊ शकतात अशा चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत.
केव्हा सादर होणार अर्थसंकल्प ?
मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तसेच 28 फेब्रुवारी 2024 ला राज्य शासनाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
वित्तमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यात महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, सरकारी कर्मचारी इत्यादी वर्गांसाठी महत्त्वाच्या घोषणा होतील असे बोलले जात आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या काळात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असल्याने या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा होणार आहेत. परिणामी, या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.