Maharashtra Onion News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच अच्छे दिन आले आहेत. कारण की कांद्याच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ नमूद केली जात आहे. कांदा बाजारभाव वधारले असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
खरंतर पुढील महिन्यात दिवाळी सण येणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना सणासुदीच्या काळात पैशांची निकड भासत आहे. अशातच आता कांद्याच्या बाजारभावात चांगली सुधारणा झाली असल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. काल देखील राज्यातील काही महत्त्वाच्या बाजारात कांद्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दरम्यानचा कमाल भाव मिळाला आहे.
कुठं मिळाला सर्वोच्च भाव
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल पांढऱ्या कांद्याला कमाल 5500, किमान 200 आणि सरासरी 2400 रुपये एवढा भाव मिळाला आहे. तसेच सोलापूर एपीएमसी मध्ये काल लाल कांद्याला हे चांगला भाव मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला किमान 100, कमाल 5,100 आणि सरासरी दोन हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे.
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये काल लोकल कांद्याची 408 क्विंटल आवक झाली होती. कालचा लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1000, कमाल 5000 आणि सरासरी 3000 असा विक्रमी भाव मिळाला होता.
अहमदनगर मध्ये काय भाव मिळाला
नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल १८५४१ क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 4200 आणि सरासरी 3500 एवढा भाव मिळाला होता.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 3590 आणि सरासरी 3250 असा भाव मिळाला होता.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल उन्हाळी कांद्याची 2614 क्विंटल आवक झाली. कालच्या लिलावात या बाजारात कांद्याला किमान 400, कमाल 4000 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला होता.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात काल 36 हजार 202 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. कालच्या लिलावात या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल 4000 आणि सरासरी 2900 एवढा भाव मिळाला आहे.