Maharashtra Petrol Diesel Price : केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता काबीज केल्यानंतर 23 जुलैला पहिल्यांदाच केंद्रातील मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला जाणार असा दावा केला जात होता. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले जाऊ शकते असे म्हटले जात होते. मात्र तसे काही घडले नाही.

पेट्रोलियम उत्पादनांना अजूनही जीएसटीच्या कक्ष बाहेरच ठेवले गेले आहे. जर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले असते तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी कपात झाली असती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती यामुळे आठ रुपयांपर्यंत कमी झाल्या असत्या.

Advertisement

मात्र केंद्रातील सरकारने पेट्रोलियम उत्पादनांना अजूनही जीएसटीच्या कक्ष बाहेरच ठेवले आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव थोडेसे कमी झाले आहेत तर काही ठिकाणी इंधनाचे भाव किंचित वाढलेले आहेत.

अशा परिस्थितीत, आता आपण राज्यातील कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत आणि कुठे कमी झाल्या आहेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कसे आहेत पेट्रोल डिझेलचे दर ?

तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमतीनुसार आज राज्यातील अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, धुळे, नागपूर, नांदेड, नंदुरबार, पालघर, यवतमाळ या शहरांममध्ये पेट्रोलचे दर कमी झालेत. पण उस्मानाबाद, परभणी, पुणे, सांगली येथे मात्र पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे.

Advertisement

डिझेल बाबत बोलायचं झालं तर आज चंद्रपूर, गोंदिया, पालघर, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, लातूर या शहरांत डिझेलचे दर किंचित कमी झाले आहेत. मात्र वर्धा या शहरात डिझेलच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, आता आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

शहराचे नाव पेट्रोलचे चालु दर डिझेलचे चालु दर 
अहमदनगर१०३.८७९०.४२
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०८९०.६६
धुळे१०३.९४९०.४८
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.४०९१.९१
जालना१०५.६२९२.०९
कोल्हापूर१०४.०१९०.५८
लातूर१०५.२९९१.८०
राजधानी मुंबई १०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०४.९४९१.४५
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.१४९०.६६
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.३९९०.९४
सातारा१०४.९०९१.४०
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०३.८९९०.३९
वर्धा१०४.४९९१.०४
वाशिम१०४.५७९१.११
यवतमाळ१०४.८७९१.४०

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *