Maharashtra Railway : रेल्वे हे भारतातील प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरू झालेली रेल्वे सध्या भारतातील सर्वच छोट्या-मोठ्या शहरांमध्ये पोहोचली आहे. यामुळे भारतातील कोणत्याही शहरात प्रवास करायचा असला तर रेल्वेला पसंती दाखवली जाते.
विशेष म्हणजे रेल्वेचे भाडे हे खूपच कमी आहे. याचा परिणाम म्हणून रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतो.
दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या मार्गांवर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.
अमरावती ते सातारा दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी दिनांक 23 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली आहे.
ही गाडी अनारक्षित असून सातारा येथे काल दुपारी साडेचार वाजता पोहोचली आहे. आता 28 जानेवारी 2023 ला ही गाडी सातारा येथून अमरावतीकडे रवाना होणार आहे.
गाडी अमरावती येथे 29 जानेवारी 2023 ला अकरा वाजता पोहोचणार अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे.
विशेष म्हणजे या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड,कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाइन, पुणे, जेजुरी, लोणंद आणि सातारा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. निश्चितच या विशेष एक्सप्रेस गाडीमुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे गर्दी नियंत्रणात येईल आणि रेल्वेचा प्रवास आधीच्या तुलनेत आणखी चांगला होईल असे बोलले जात आहे.