Maharashtra Railway News : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या शिवाय संपूर्ण देशात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण देशात मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, लग्न सराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच भर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील चालु झाल्या आहेत.
या चालू महिन्यात गुढीपाडव्याचा देखील मोठा सण येणार आहे. अशा परिस्थितीत विविध रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टी, सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईच्या हंगामामुळे होणारी गर्दी पाहता विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष गाडी उधना जंक्शन ते मंगळूरू अशी चालवली जाणार आहे. या मार्गावर ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालेल म्हणजे द्वि-साप्ताहिक गाडी राहणार आहे.
आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत. तसेच या गाडीला राज्यातील कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे याविषयी देखील माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
उधना जंक्शन ते मंगळूर जंक्शन ही विशेष गाडी उधना रेल्वे स्थानकावरून 31 मार्च आणि तीन एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सोडून जाणार आहे.
तसेच मंगळूरु जंक्शन ते उधना जंक्शन यादरम्यान चालवली जाणारी गाडी एक एप्रिल आणि चार एप्रिल ला मंगळुरू रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
ही विशेष गाडी हे दोन दिवसं रात्री दहा वाजता मंगळूरु जंक्शनवरून रवाना होणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार हे पाहणार आहोत.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी या मार्गावरील वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत जाणार आहे.
यामुळे निश्चितच गर्दीच्या काळामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून या गाडीमुळे त्यांचा प्रवास जलद होणार आहे.