Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट राज्यातील पश्चिम भागातील प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. खरंतर रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे.
आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. राज्यातही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसात थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस कोरोना काळापासून बंद करण्यात आली आहे. पुण्यामार्गे धावणारी ही एक्सप्रेस ट्रेन कोरोना काळात बंद करण्यात आली असल्याने मुंबई-पुणे-कोल्हापूर हा प्रवास खूपच आव्हानात्मक बनला आहे. कोल्हापूर मधील रेल्वे प्रवाशांना मुंबईकडील प्रवास करताना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे ही बंद करण्यात आलेले एक्सप्रेस ट्रेन पुन्हा एकदा सुरू केली पाहिजे अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उपस्थित केली जात आहे. अशातच आता रेल्वे प्रवाशांची ही मागणी आता लवकरच पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कारण की मध्य रेल्वेने सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू करण्याबाबतचा सविस्तर असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सुपूर्द केला असल्याचे महत्त्वाचे वृत्त एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आले आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वे मधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्डाकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच रेल्वे बोर्ड यावर रेल्वे प्रवाशांचे हित लक्षात घेऊन सकारात्मक असा निर्णय घेईल असा आशावाद देखील मध्य रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे. यामुळे आता रेल्वे बोर्ड मुंबई ते कोल्हापूर दरम्यान पुणेमार्गे धावणारी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत काय निर्णय घेते ? याकडे मुंबई, कोल्हापूर आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.