Maharashtra Railway News : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान रेल्वेचा प्रवास आणखी मजबूत व्हावा यासाठी राज्यात वेगवेगळ्या रेल्वे मार्गांचे काम पूर्ण केले जात आहे. अशातच आता महाराष्ट्राला आणखी एका नवीन रेल्वे मार्गाची भेट मिळणार अशी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच वर्धा ते कळंब हा रेल्वे मार्ग 28 फेब्रुवारी 2024 ला सुरू होणार आहे. याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
खरेतर हा वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प 284.65 किलोमीटर लांबीचा आहे. खरेतर या प्रकल्पाचे भूमिपूजन 2009 मध्ये झाले होते.
त्यावेळी या प्रकल्पासाठी 274.55 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प रखडत गेला आणि आजच्या घडीला या प्रकल्पासाठी पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान आतापर्यंत या प्रकल्पासाठी 1910 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी, भिडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या स्थानकाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे वर्धा ते कळंब दरम्यान ट्रायल रन देखील यशस्वी झाली आहे. ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर रेल्वे बोर्डाकडे या मार्गावर ट्रेन चालवण्यासाठी चा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आणि 12 जानेवारी 2024 ला याचे उद्घाटन होणार अशी माहिती समोर आली होती. मात्र याचे नियोजित मिळतील उद्घाटन होऊ शकले नाही. यानंतर 11 फेब्रुवारीला उद्घाटन होणार असे बोलले जात होते.
पण, उद्घाटनाचा हा देखील मुहूर्त हुकला आणि आत्ता 28 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होणार अशी बातमी समोर येत आहे.
28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून याचवेळी या मार्गाचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या माध्यमातून उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.