Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच गाड्या हाउसफुल धावत आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत आहे.
यामुळे मात्र रेल्वेचा प्रवास आता आव्हानात्मक वाटू लागला आहे. अशा परिस्थितीत, अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. अशातच आता मुंबईकरांच्या सोयीसाठी देखील उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम या दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
या गाडीच्या एकूण बारा फेऱ्या होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम अशा सहा आणि थिविम ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशा सहा फेऱ्या होणार आहेत.
या विशेष गाडीची मुंबईहुन पहिली फेरी 26 एप्रिल ला होणार आहे. तर थिविमहुन पहिली फेरी 27 एप्रिलला होणार आहे. एलटीटी ते थिविम दरम्यान 26 एप्रिल ते पाच मे या कालावधीत या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
या कालावधीत गाडी क्रमांक 01017 ही एलटीटी ते थिविम ही विशेष एक्सप्रेस ट्रेन दर शुक्रवार, रविवार आणि मंगळवारी एलटीटी रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार आहे. तसेच, गाडी क्रमांक 01018 थिविम ते एलटीटी विशेष एक्सप्रेस ट्रेन शनिवारी, सोमवारी आणि बुधवारी चालवली जाणार आहे.
यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या गाडीला कोकणातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून याचा कोकणातील चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान आता आपण ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
या गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.