Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात खूपच अधिक आहे.
रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जाते.
दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या मार्गावर सुरू झालेल्या एका विशेष ट्रेनला आता मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
जबलपूर ते कोईमतुर दरम्यान सुरू झालेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेला आहे. खरे तर ही गाडी मार्च 2024 अखेरपर्यंत धावणार होती.
मात्र या मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता आणि या गाडीला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता रेल्वे शासनाने ही गाडी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत ही गाडी धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जबलपूर जंक्शन ते कोईमतूर जंक्शन दरम्यान सुरू झालेली विशेष एक्सप्रेस ट्रेन सात जून पर्यंत धावणार आहे.
या कालावधीत ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर जंक्शन येथून सुटणार आहे. दुसरीकडे कोईमतुर जंक्शन ते जबलपूर जंक्शन दरम्यान सुरू झालेली विशेष एक्सप्रेस ट्रेन चार जून पर्यंत चालवली जाणार आहे.
ही गाडी दर सोमवारी चालवली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेली ही विशेष एक्सप्रेस ट्रेन कोकणातील रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत आहे.
पण, ही गाडी कल्याण या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर देखील थांबली पाहिजे अशी मागणी आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा देखील झाला आहे.
पण रेल्वे प्रशासनाने या गाडीसाठी कल्याणला थांबा मंजूर केलेला नाही. यामुळे अनेकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त होत आहे.