Maharashtra Railway News : भारतात प्रवासासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. याचे कारण म्हणजे हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे.
शिवाय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी याच प्रवासाला अधिक प्राधान्य दिले जाते.
सणासुदीच्या काळात तर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर देखील विविध रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हीच शक्यता लक्षात घेता राज्यातील कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वेने याबाबतचा निर्णय घेतला असून यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
कोणत्या मार्गांवर धावणार विशेष एक्सप्रेस ट्रेन ?
कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद ते मडगाव या मार्गावर ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
अहमदाबाद ते मडगाव गाडी 19 आणि 26 मार्चला चालवली जाणार आहे. ही गाडी अहमदाबाद रेल्वे स्थानकावरून सकाळी साडेनऊ वाजता सुटणार आहे.
दुसरीकडे मडगाव ते अहमदाबाद ही गाडी 20 आणि 27 मार्चला चालवली जाणार आहे. ही गाडी मडगाव जंक्शन येथून सकाळी आठ वाजता सुटणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
Konkan Railway कडून मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.
पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही विशेष एक्सप्रेस ट्रेन थांबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.