Maharashtra Rain : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सूनसंदर्भात. राज्यात 11 जूनला मान्सूनच आगमन झालं. राज्यातील तळकोकणात मान्सून पोहोचला. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढील प्रवास करता आला नाही. मान्सून जवळपास सात ते आठ दिवसापासून तळ कोकणातच पाहायला मिळत आहे.
यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे केव्हा आगमन होणार आणि मोसमी पावसाला केव्हा सुरुवात होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. अशातच शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सूनचे लवकरच मुंबईमध्ये आगमन होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाची देखील शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 72 तासात मान्सून राजधानी मुंबईमध्ये पोहोचणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यात मान्सूनचे सर्वप्रथम तळ कोकणात आगमन होते त्यानंतर मग मुंबईमध्ये आगमन होत असते.
सध्या मान्सून तळ कोकणात आहे आणि आता येत्या 72 तासात तो मुंबईमध्ये दाखल होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी आता पोषक हवामान तयार होत असल्याचे मत हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आल आहे. एकंदरीत, आता मान्सूनचा पुढील प्रवास वेगवान होणार असून पुढील 72 तासात मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता येत्या काही तासात मान्सून मुंबईमध्ये पोहोचणार आहे. तसेच राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.