Maharashtra Rain : हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. यामध्ये भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता तयार होत असल्याचा मोठा दावा केला आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या दोन दिवसांनी अर्थातच पाच एप्रिल नंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. यामुळे साहजिकच राज्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे.
हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आणि पुन्हा अवकाळी पाऊस बरसला तर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पाच एप्रिल पासून ते 8 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे.
यात मध्य महाराष्ट्रात पाच ते आठ एप्रिल दरम्यान कोकण आणि मराठवाड्यात सहा ते आठ एप्रिल दरम्यान आणि विदर्भात सात आणि आठ एप्रिलला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांनी विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे. मार्च महिन्याचा शेवट हा देखील वादळी पावसाने झाला आहे आणि आता एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने होणार असा अंदाज आहे.
त्यामुळे साहजिकच हवामान खात्याचा हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणखी मोठे नुकसान होऊ शकते.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिलला अर्थातच शुक्रवारी महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे सहा एप्रिलला राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव या दहा जिल्ह्यांमध्ये काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होणार अशी शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढ देखील पाहायला मिळणार आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रात दिवसाच्या कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होणार असा अंदाज दिला आहे.