Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार अशा बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे राज्यात पाच एप्रिल पासून म्हणजेच आजपासून वादळी पावसाला सुरुवात होणार ते आठ-नऊ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार असा अंदाज समोर येत आहे.
या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये जोराचा पाऊस पडू शकतो असे देखील बोलले जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांची मात्र मोठी चिंता वाढली आहे. अस घडल्यास उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होईल आणि त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. परिणामी, यंदा गुढीपाडव्याला महाराष्ट्रात खरच मुसळधार पाऊस पडणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून तथा सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
खरंतर, सध्या स्थितीला राज्यातील काही भागांमधील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करण्यात व्यस्त आहेत. काही ठिकाणी मळणीची कामे देखील केली जात आहेत. अशा परिस्थितीत, जर वादळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
दरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, गुढीपाडव्याला पाऊस पडणार की नाही, पाऊस झालाच तर पावसाचे प्रमाण कसे राहणार याबाबत सविस्तर अशी माहिती दिलेली आहे.
काय म्हणताय खुळे
यावर्षी गुढीपाडवा नऊ एप्रिलला आहे. दरम्यान आज पासून अर्थातच 5 एप्रिल पासून ते गुढीपाडवा पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार अशा बातम्या समोर आल्या आहेत.
माणिकराव खुळे यांनी मात्र उद्यापासून अर्थातच 6 एप्रिल ते 9 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात फक्त ढगाळ हवामान राहील आणि अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला आहे.
त्यांनी सांगितले की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 8 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येच फक्त पावसाची शक्यता अधिक जाणवत आहे.
यामुळे अवकाळी पावसाची धास्ती घेऊ नये. शेतकऱ्यांनी सावध राहून आपली शेतीची कामे करावीत. या पावसाला खूप जास्त घाबरण्याचे कारण नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
एकंदरीत माणिकराव खुळे यांनी उद्यापासून म्हणजेच 6 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत राज्यातील काही भागात फक्त ढगाळ हवामान तर काही भागात अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ, हलका पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे.