Maharashtra State Employee News : महाराष्ट्रातील तब्बल 90 हजार कर्मचाऱ्यांची पीएफ आणि ग्रॅज्युएटीची 1500 कोटी रुपयांची रक्कम थकली असल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थातच एस टी महामंडळाच्या 90000 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाणारी भविष्य निर्वाह निधी अर्थातच पीएफ रक्कम आणि ग्रॅच्युईटीची म्हणजेच उपदानाची रक्कम तब्बल गेल्या बारा महिन्यांपासून थकवली गेली असल्याची बातमी एका प्रसिद्ध वृत्तपत्रातून समोर आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युईटीचा व्यवहार पाहण्यासाठी एक स्वतंत्र ट्रस्ट अर्थातच मंडळ स्थापित करण्यात आले आहे.

Advertisement

या ट्रस्ट कडे एसटी महामंडळ भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ आणि ग्रॅच्युइटीची रक्कम जमा करत असते. भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाते आणि अर्धी रक्कम महामंडळाकडून दिले जाते.

मात्र गेल्या बारा महिन्यापासून ही रक्कम ट्रस्ट कडे एसटी महामंडळाने वर्ग केली नसल्याचे धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या एका वर्षभराची जवळपास 1500 कोटी रुपयांची रक्कम ट्रस्टकडे वर्ग करण्यात आली नसल्याने एस टी महामंडळाचा ट्रस्ट आर्थिक अडचणीत आला आहे.

Advertisement

यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. सरकारकडून प्रत्येक महिन्याला एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम दिली जात आहे.

मात्र ही सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम कधीच वेळेवर मिळालेली नाही ही वास्तविकता आहे. दरम्यान या उशिराने मिळणाऱ्यां सवलत मूल्य प्रतिपूर्ती रकमेमधून फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागवणे शक्य होत आहे.

Advertisement

मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधी आणि उपदानाची रक्कम ट्रस्ट कडे जमा होत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे ट्रस्ट अडचणीत सापडले आहे. साहजिकच याचा फटका हा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *