Maharashtra State Employee News : यावर्षी 10 नोव्हेंबर पासून दिवाळीचा पर्व सुरू होणार आहे. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सबंध देशभरात साजरा केला जाणार आहे. दिवाळी हा हिंदू, सनातन धर्मात एक मोठा सण आहे.
या सणाला नवनवीन अलंकाराची, कपड्यांची खरेदी केली जाते. या सणाला अनेकजण नवीन वाहन सुद्धा खरेदी करतात. जर कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर दिवाळी सणाला सुरू केला जातो. दरम्यान या आनंदमयी सणाच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रातील काही राज्य कर्मचाऱ्यांना यावर्षी ऐन दिवाळीत वेतन मिळणार नसल्याचे एक धक्कादायक वास्तव उघडकीस आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात 20 ते 60 टक्के अनुदान मिळणाऱ्या अंशतः अनुदानित शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना यंदाच्या दिवाळीत वेतन मिळणार नाही.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यात 20 ते 60 टक्के अनुदान मिळणाऱ्या अंशतः अनुदानित शाळेत जवळपास 60000 हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. मात्र या साठ हजार शिक्षकांसाठी यंदाची दिवाळी आर्थिक तंगीत जाणार असे चित्र आहे. कारण की या कर्मचाऱ्यांना केवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वेतन मिळणार आहे.
या शिक्षकांच्या वेतन निधी हेडला ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंबंधीत शिक्षकांच्या नोव्हेंबर महिन्यातील वेतनासाठी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले जात होते. किंबहुना हे अपेक्षित होते.
मात्र सरकारने पावसाळी अधिवेशनातं यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीत वेतन मिळणार नाही असे सांगितले जात आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मात्र या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद होऊ शकते असे सांगितले जात आहे.
याचाच अर्थ नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे वेतन या संबंधित कर्मचाऱ्यांचे रखडणार असल्याचे चित्र तयार होत आहे. ऐन दिवाळीत या संबंधित कर्मचाऱ्यांवर आर्थिक तंगी येणार आहे. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात नाराजीचा सूर आवळला आहे.