Maharashtra State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकांच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताचं 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे.
तसेच राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या पेन्शन धारकांचा महागाई सवलत भत्ता देखील 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे. याचा रोख लाभ मात्र जुलै महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे.
अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या सहा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देखील यावेळी दिली जाणार आहे. दरम्यान, राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा तब्बल नऊ टक्क्यांनी वाढला आहे.
ज्याप्रमाणे जानेवारी 2024 पासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सातवा वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला आहे त्याचप्रमाणे राज्यातील सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील नऊ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
याबाबतचा शासन निर्णय देखील महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून नुकताच जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार, असुधारित वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगांनुसार वेतन / निवृत्तीवेतन घेणाऱ्यांचा महागाई भत्ता हा 230 टक्क्यावरून 239% एवढे करण्यात आला आहे.
म्हणजे सहावा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 9 टक्क्यांनी वाढला आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. यामुळे जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कमही सदर सहावा वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे.
यामुळे सातवा वेतन आयोगाप्रमाणेच सहावा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या सरकारी नोकरदार मंडळीला देखील या महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.