Maharashtra State Employee News : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला समाप्त होणार आहे. यामुळे भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तेव्हापासून देशात आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान देशात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% एवढा करण्यात आला आहे. जानेवारी 2024 पासून वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला असून याचा लाभ केंद्रीय शासकीय सेवेत रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनधारकांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे.
अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात जे वेतन मिळेल त्यासोबत या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे. अशातच, आता राज्यातील मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
होळी आणि धुलिवंदन सणाच्या पूर्वीच मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. सदर कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकेने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% एवढा करण्यात आला आहे.
म्हणजेच सदर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना तथा निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 1 जानेवारी 2024 पासून वाढवण्यात आला आहे.
महागाई भत्त्यात झालेली चार टक्के वाढ ही 1 जानेवारी 2024 पासून लागू असून याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जे वेतन कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्यासोबत दिला जाणार आहे. अर्थातच या सदर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे.
मार्च महिन्यात याचा रोख लाभ मिळणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मुंबई महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना तथा निवृत्तीवेतनधारकांना दिला जाणार आहे.
यामुळे होळी सणाच्या पूर्वीच मुंबई महापालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठी भेट मिळाली असल्याचे बोलले जात आहे.