Maharashtra State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी कामाची बातमी आहे. या मंडळीला जुलै महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच जो पगार ऑगस्ट महिन्यात हातात येईल त्या पगारांसोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत.
यामुळे संबंधित नोकरदार मंडळीला नक्कीच मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार सोबत नेमके कोणकोणते लाभ मिळणार आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य कर्मचाऱ्यांना कोणकोणते लाभ मिळणार
महागाई भत्ता वाढ : केंद्रातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च 2024 मध्ये वाढवला गेला. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला. त्याचा रोख लाभ हा मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला गेला.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% करण्यात आला आहे. ही वाढ देखील जानेवारी महिन्यापासूनच लागू करण्यात आली आहे. आधी राज्य कर्मचाऱ्यांना देखील 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता.
आता मात्र यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून 50% झाला आहे. याचा रोख लाभ मात्र राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या पगारा सोबत मिळणार आहे.
महागाई भत्ता फरक : राज्य कर्मचाऱ्यांची चार टक्के महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 पासून लागू आहे. याचा रोख लाभ हा जुलै महिन्याच्या पगारा सोबत मिळणार आहे.
अर्थातच जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. ही रक्कम देखील जुलै महिन्याच्या पगारा सोबतचं मिळणार आहे.
वार्षिक वेतनवाढ : राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढीचा लाभ दिला जात असतो. यावर्षी देखील राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या पगारांसोबत वार्षिक वेतन वाढीचा लाभ मिळणार आहे. यामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना हा मोठा फायद्याचा राहणार आहे.