Maharashtra Vande Bharat Express : येत्या दोन दिवसात अर्थातच 15 ऑक्टोबर पासून देशात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाची धूम राहणार आहे. 24 ऑक्टोबरला देशात विजयादशमीचा अर्थ दसऱ्याचा देखील सण साजरा होणार आहे.
यानंतर पुढल्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
खरंतर, वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राला आतापर्यंत पाच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली होती. मात्र आता ही संख्या सहा एवढी बनली आहे.
कारण की महाराष्ट्रातील उपराजधानीला अर्थातच नागपुरला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने इंदूर ते भोपाळ दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस थेट नागपूरपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या सहा एवढी होणार आहे. सोमवारपासून अर्थातच 9 ऑक्टोबर 2023 पासून भोपाळ ते इंदूर दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस थेट नागपूरपर्यंत चालवली जात आहे. यामुळे दि टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अर्थातच नागपूरसहित संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
यामुळे इंदूर ते नागपूर हा प्रवास गतिमान होणार आहे. महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील रेल्वे प्रवाशांना या गाडीमुळे मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत, स्टोपेज बाबत जाणून घेणार आहोत.
कसं असेल वेळापत्रक ?
गाडी क्रमांक 20911 इंदूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस इंदूर स्थानकावरून सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि ही गाडी नागपूर स्थानकावर दुपारी अडीच वाजता पोहोचेल. तसेच 20912 नागपूर-इंदूर वंदे भारत एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी निघेल आणि रात्री पावणे बारा वाजता इंदूर येथे पोहोचेल.
कसे असतील थांबे ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी नागपुर, इटारसी, भोपाल, उज्जैन आणि इंदोर या स्थानकावर थांबणार आहे.
राज्यातील कोणत्या मार्गावर सुरू आहे वंदे भारत एक्सप्रेस
महाराष्ट्रातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात आहे. इंदूर ते नागपूर ही वंदे भारत एक्सप्रेस अलीकडेच सुरू झाली आहे.