Maharashtra Weather Update : सध्या भारतासहित संपूर्ण जगात क्रिकेट विश्वचषकाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आपल्या देशात अगदी गल्लीबोळापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र क्रिकेट वर्ल्ड कपच्या चर्चा पाहायला मिळत आहेत.
दरम्यान वर्ल्ड कपचे लीग स्टेज मधील सर्व सामने खेळवले गेले आहेत. यामधील टॉप चार संघ आता सेमी फायनलसाठी फिडणार आहेत. भारत-न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया-साऊथ आफ्रिका यांच्यात सेमी फायनलची लढत रंगणार आहे.
उद्या अर्थातच 15 नोव्हेंबर 2023 रोजी वर्ल्ड कप ची पहिली सेमी फायनलची लढाई रंगणार आहे. पहिला सेमी फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना उद्या 15 नोव्हेंबरला मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
उद्या दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तथापि टॉस हा सामना सुरू होण्याच्या अर्धा तास पूर्वीच केला जाणार आहे. दुपारी दीड वाजता टॉस होईल आणि त्यानंतर दोन वाजता सामन्याला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
देशभरातील क्रिकेट प्रेमींचे या सामन्याकडे बारीक लक्ष लागून राहणार आहे. अशातच काही क्रिकेट प्रेमींना उद्या राजधानी मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी लागणार की काय आणि सेमी फायनलचा सामना पावसामुळे प्रभावित होणार की काय अशी भीती लागली आहे.
खरंतर 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल मध्ये भिडले होते आणि त्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. पावसामुळे हा सामना भारताला गमवावा लागला होता. 2019 मधला हा सामना तब्बल दोन दिवस चालला होता.
यामुळे आता उद्या होणाऱ्या सामन्यावेळी मुंबईत पाऊस हजेरी लावणार का? असा सवाल क्रिकेटप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबई सह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीत नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
मात्र आज राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे आहे. तसेच उद्या 15 नोव्हेंबरला मुंबईत ऊन पडणार आहे. या दिवशी किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
त्याचवेळी ताशी 14 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. अर्थातच उद्या मुंबईमध्ये पावसाची शक्यता नाहीये. यामुळे उद्याच्या सेमी फायनलच्या सामन्यात पावसाचे विघ्न पडणार नाही असा अंदाज आहे.