Maharshtra Monsoon News : गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये मान्सून बाबत विविध चर्चा पाहायला मिळत आहेत. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यावर्षी मान्सूनचे अंदमानात वेळे आधीच आगमन होणार असे म्हटले आहे. यंदा मान्सून अंदमानात दोन दिवस आधीच दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
दरवर्षी मानसून हा 21 मे च्या सुमारास अंदमानात दाखल होत असतो. यंदा मात्र लवकरच मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्याने मान्सून अंदमानात दोन दिवस आधी म्हणजेच 19 मे च्या सुमारास दाखल होणार असे म्हटले जात आहे.
भारतीय हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे, अंदमानात यंदा 13 मे ला रात्री उशिरा मान्सूनच्या हालचाली तयार होण्यास सुरुवात झाली होती. मग पुढे 14 मे ला या हालचालींना आणखी वेग आला.
यामुळे आता मान्सून अंदमानत 19 मे च्या सुमारास दाखल होऊ शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याचा हा अंदाज मंगळवारी समोर आला आणि त्यानंतर या वर्षी केरळमध्ये देखील लवकरच मान्सूनचे आगमन होणार असे बोलले जाऊ लागले.
यामुळे खरंच यंदा मान्सूनचे केरळमध्ये वेळेआधीच आगमन होणार का ? आपल्या महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधीच पोहोचणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून अंदमानात 18 मेपर्यंत, तर केरळात 31 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता अधिक जाणवत आहे. हेच कारण आहे की, यंदा मान्सूनसाठी खूपचं लवकर अनुकूल स्थिती तयार झाली आहे. मान्सूनच्या वार्यांचा वेग प्रचंड वाढला आहे.
त्यामुळे मान्सून वेळेआधीच अंदमान व केरळात दाखल होऊन महाराष्ट्रात देखील वेळेआधीच येण्याची शक्यता आहे. निश्चितच ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता राहणार आहे. मान्सूनचे वेळेआधी आगमन झाले तर शेती कामांना वेग येणार आहे.