Mansoon 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने मान्सून बाबतचा आपला पहिला अंदाज जारी केला आहे. पंधरा तारखेला जाहीर केलेल्या हवामान अंदाजात हवामान खात्याने यावर्षी मान्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
हवामान खात्याचा अंदाजामुळे शेतकरी मोठे प्रसन्न आहेत. खरे तर गेल्या वेळी मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यंदा मात्र सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती भासणार नाही असे बोलले जात आहे.
यासंदर्भात हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी देखील मोठी अपडेट दिली आहे. यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात केव्हा आगमन होणार ? राजधानी मुंबईत मान्सून केव्हा पोहोचणार या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया माणिकराव खुळे यांनी काय म्हटले आहे ते.
2024 च्या मान्सूनमध्ये अधिकचा पाऊस पडण्याचे कारण?
माणिकराव खुळे यांनी मान्सून संदर्भात बोलताना असे म्हटले आहे की, जून-जुलै पर्यंत एलनिनो हा न्यूट्रल अवस्थेत येणार आहे. ज्यावेळी एलनिनो हा न्यूट्रल अवस्थेत असतो त्यावेळी मान्सूनवर कोणताच परिणाम होत नाही. तसेच ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये ला-निना येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय भारतीय मानसूनवर परिणाम करणारा इंडियन ओशियन डायपोल हा घटक देखील यंदा मान्सूनला अनुकूल ठरणार आहे.
खुळे यांनी म्हटल्याप्रमाणे यंदा इंडियन ओशियन डायपोल अर्थातच आयओडी पॉझिटिव्ह राहणार असे संकेत मिळत आहेत. म्हणजेच एलनिनो जाणार आणि ला-निना येणार आणि आयओडी पॉझिटिव्ह राहणार या साऱ्या संभाव्य हवामान प्रणालीमुळे यावर्षी मान्सून काळात चांगला पाऊसमान राहणार असे बोलले जात आहे.
यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असा अंदाज आहे. मात्र यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसू शकतो, यामुळे शेतीपिकांचे नुकसानही होण्याची शक्यता आहे.
मान्सून मुंबईत केव्हा दाखल होणार?
दरवर्षी मान्सून एक जुनच्या सुमारास भारताच्या मुख्य भूमीत दाखल होतो अर्थातच केरळमध्ये येतो. यानंतर मग केरळमध्ये आलेला मान्सून तळ कोकणात दाखल होतो. महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थातच तळ कोकणात मान्सूनचे सात जुनच्या सुमारास आगमन होते. यानंतर पुढे तीन ते चार दिवसांनी मान्सूनचे आगमन राजधानी मुंबईत होते. मुंबईत 10 जूनच्या सुमारास मानसून पोहोचतो.
इथून पुढे मग संपूर्ण महाराष्ट्रभर मानसून पसरतो. पण, यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात किंवा मुंबईत केव्हा आगमन होणार ? याबाबत आताच अंदाज बांधणे कठीण असल्याचे खुळे यांनी म्हटले आहे. कारण की मान्सूनचे आगमन आणि मान्सून कालावधीत पडणारा पाऊस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पॅरामीटरवर मोजल्या जातात.
मानसून आगमनाचा अंदाज बांधताना वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान, दक्षिण भारतातील ४ राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन, दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा, मलेशिया थायलंड पश्चिम कि. पट्टीवर १ ते दिड किमी.
दरम्यान वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब आणि बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडोनेशिया, दरम्यानचा पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा या साऱ्या घटकाची पाहणी केली जाते आणि यानंतर मग महाराष्ट्रासहित देशात मान्सूनचे आगमन केव्हा होणार हे ठरते. यामुळे महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन केव्हा होणार हे मान्सूनच्या दुसऱ्या अंदाजात स्पष्ट होऊ शकणार आहे.